आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10th Result: 8 जूनला दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होईल निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या शालांत (दहावी) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. दहावीचा निकाल सोमवार, 8 जूनला ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर निकाल ऑनलाइन पाहाता येईल. www.mahresult.nic.in, www.msbshse.ahc.in या वेबसाईट्सवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे. तसेच 15 जूनला शाळेमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.

यंदा दहावीच्या निकालाला विलंब झाल्यामुळे निकालाच्या तारखेवरून राज्यभरात अनेक वावड्या उठत होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अखेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी आज (शनिवार) निकालाची तारीख जाहीर केली.

यंदा राज्यातील नऊ विभागातून 17 लाख 32 हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर आदी मंडळांचा समावेश आहे. सर्व विभागांचा एकाच दिवशी म्हणजे 8 जूनला निकाल जाहीर करण्‍यात येणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, असा पाहाता येईल निकाल...