आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी साथीदारांच्या मदतीने टाकला दरोडा; 11 जणांची टोळी गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नगर-राहुरी ते मुंबर्इ एसटी बसला लोणीकंद गावाच्या हद्दीत थांबवत बसमधील कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने उतरवून त्यांच्याकडील ६४ लाख ९३ हजार रुपये चोरट्यांनी २९ डिसेंबर रोजी पळवले होते.

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ११ जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्या ताब्यातून ५३ लाख ७० हजार रुपयांची रोकड, दोन चारचाकी व दोन बुलेट असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस िनरीक्षक राम जाधव यांनी िदली. विशेष म्हणजे अटक करण्यात अालेल्यांपैकी दाेन जण पाेलिस दलाच्या सुरक्षा पथकात (एसपीयू) अाहेत.
रूपेश गायकवाड, सुनील ऊर्फ कपिल रंदवे (रा. पुणे) या दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांसह ज्ञानेश्वर साेनमाळी, श्यामसिंग परदेशी, भरत िनवृत्ती कांडेकर, सचिन प्रकाश राजगुरू, राजेंद्र माेहन फडतरे (सर्व रा. केडगाव, जि. अहमदनगर), अश्विन िगरवले (रा. देऊळगाव िसद्धी, अहमदनगर), शरद दत्तात्रय यादव, अमाेल बापूसाहेब िनकम आणि रवींद्र िदवाण (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

नगर येथील राेहिदास िचताळे हे मित्र अनिल अाैसरकर यांच्यासह अाधुनिक कुरियर्स, साेमाणी कुरियर्स व गांधी कुरियर्सच्या पार्सलची गाेणी घेऊन अहमदनगर-राहुरी ते मुंबई एसटीने प्रवास करत हाेते. या वेळी लाेणीकंद गावाच्या हद्दीत २९ डिसेंबरच्या रात्री अज्ञातांनी एसटी थांबवली. त्यानंतर चिताळे व औसरकर यांना त्यांनी खाली उतरवून त्यांच्याकडील रक्कम चोरून नेली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

नगरपासून ठेवली बसवर पाळत
दराेडेखाेर हे नगरपासून एसटीचा कारमधून पाठलाग करत हाेते. लाेणीकंद परिसरात अाल्यावर दाेन बुलेटही एसटीचा पाठलाग करत होत्या. लाेणीकंद गावाच्या हद्दीत एक इंडिकाही पाळत ठेवण्यास अाली होती. त्यानंतर दराेडेखाेरांनी जबरदस्तीने एसटी थांबवत चिताळे व अाैसरकर यांना खाली उतरवून त्यांच्याकडील रक्कम पळवली.
बातम्या आणखी आहेत...