आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: टेम्पो ट्रॅव्हलर-ट्रकच्या अपघातात 11 ठार, डुक्कर अाडवे अाल्याने चालकाचा ताबा सुटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रकला धडकल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरची अशी अवस्था झाली. - Divya Marathi
ट्रकला धडकल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरची अशी अवस्था झाली.
पुणे - पुण्याहून अक्कलकोट येथे दर्शनासाठी  निघालेल्या भाविकांचा टेम्पाे ट्रॅव्हलर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास उरळीकांचन जवळील काेरेगाव हद्दीत इनामदार वस्तीजवळ साेलापूरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील चालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. मृत प्रवासी मुलुंड व जुन्नर येथील रहिवासी अाहेत. 

विजय बी. काळे, ज्याेती बी. काळे, याेगेश अार. लाेखंडे, जयवंत एन. चव्हाण, याेगिता जे. चव्हाण, रेवती जे. चव्हाण, जगदीश व्ही. पंडित, शैलजा व्ही. पंडित (मुलुंड ईस्ट), प्रदीप अार. अवचट, सुलभा पी. अवचट (जुन्नर), व टेम्पाेचालक केतन सुरेश पवार (२९) यांचा मृतांत समावेश आहे.
 
मुलुंड येथील भाविकांना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकाेट येथे देवदर्शनास टेम्पो ट्रॅव्हलर निघाली होती. पहाटे गाडीसमोर डुक्कर अाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ही टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्याच्या मध्यभागी असलेला कठडा तोडून येणाऱ्या ट्रकला (एमएच१३-एएक्स ३५०३) धडकली. यात चालक केतन पवार याच्यासह सर्व दहा प्रवाशांचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघाताची भीषणता दर्शवणारे PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...