आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार हापूस आंब्याचा नैवेद्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी आज अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर 11 हजार हापूस आंब्यांचा नैवेद्य अर्पण केला. पुण्यातील प्रसिद्ध आंबे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबवत परंपरेप्रमाणे गणपतीला यशाचे साकडे घातले. मंदार देसाई यांनी गणपतीची आरती करीत श्री चरणी नैवेद्य अर्पण केला. 11 हजार हापूस आंबे श्रीच्या भोवती ठेवल्यानंतर श्रींचे रूपडे अधिक आकर्षक दिसत होते.
देसाई बंधूंनी नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यातील सुमारे दीड हजार आंबे ससून रूग्णालयातील रुग्णांना वाटण्यात आले.
पुढे पाहा, श्रींचा फूल साईज फोटो...