आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणामुळेच माझ्या मुलीचा बळी; पुण्यात आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या आईचा टाहो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- वर्षभरापासून राज्यभर उठलेले मराठा क्रांतीचे वादळ काल (बुधवारी) मुंबईत धडकले. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी एकीकडे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आहे. मात्र, दुसरीकडे महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याबद्दल मराठा समाजतल्याच तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोडी येथील राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळ्फास लावून आत्महत्या केली आहे. अनिषा ठकुरे असे मृत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिषा ही 11 वीच्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून धडपडत होती. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 9 महाविद्यालयात अर्ज करून देखील तिचा एकाही महाविद्यालयात नंबर लागला नाही. त्यामुळे नैराश्यातून अनिषा हिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अनिषाला 10 वीत 67 टक्के गुण...
अनिषाने 10 वीत 67 टक्के गुण मिळवले होते. त्यानुसार तिने 11 वीच्या प्रवेशासाठी कॉमर्स शाखेत प्रवेश घ्यायची तिची इच्छा होती. तिने पुण्यातील तब्बल 9 महाविद्यालयामध्ये ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, दोन  महिने उलटून गेल्यानंतरही अमिषाचा प्रवेश निश्चित झाला नव्हता. त्यामुळे नैराशयातून अनिषाने हे पाउल उचलल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची...
अनिषाच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. प्रतिकूल परिस्थितीही तिने उत्तमरित्या शिक्षण करत होती. उच्चशिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. कलेक्टर व्हायचे तिचे स्वप्न होते. मात्र ऑनलाइन प्रवेशच्या प्रक्रियेमुळे आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आले नाही. किमान शिक्षण व्यवस्थेमधील तरी आरक्षण काढून टाका, अशा शब्दात अनिषाच्या आईने टाहो फोडला आहे. विद्यार्थ्याना शिक्षण घ्यायचे असते. मात्र आरक्षणामुळे त्यांना पुढे जाता येत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीची आई? व्हिडिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...