आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीसाठी आलेली 12 डीजे वाहने पोलिसांनी केली जप्‍त, पिंपरी चिंचवडमध्‍ये कारवार्इ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड-  गणेश विसर्जनासाठी दुसऱ्या गावातून आलेल्या तब्बल 12 डीजे वाहनांवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. ही वाहने ताब्यात घेतली आहेत. पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिक प्रचंड संख्‍येने एकत्र येत असतात. त्यांना डीजे वर थिरकण्यासाठी गणेश मंडळांकडून डीजेचीही व्‍यवस्‍था केली जाते.  मात्र या वर्षी डीजे वर बंदी असल्याने पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
 
तब्बल 12 डीजेंवर वाकड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने नगर, बार्शी, जुन्नर येथून पुण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे पोलिस परवाना आणि दुस-या शहरात डीजे वाजविण्यास RTO कडून दिला जात असलेला परवाना नव्‍हता. त्‍यामुळे वाकड पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिली. 

अशा कारवाईमुळे डीजे मुक्त गणेशउत्सव नक्कीच नागरिक अनुभुवत आहेत. मंडळांना सूचना दिल्यानंतरही काही मंडळांनी डी जे लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो वाकड पोलिसांनी उधळून लावत कायदेशीर बाबींचा पालन करत डी जे वाहनांवर आणि संबंधित मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 
या गणेशोत्‍सवात वाकड पोलिसांनी यापूर्वीही अशा कारवाया केल्‍या आहेत. त्‍यामुळे येथील नागरिक डीजेमुक्‍त गणेशोत्‍सवाचा आनंद घेत आहेत. 
 
पुढील स्‍लाइडवर जप्‍त करण्‍यात आलेली वाहने आणि डीजे...    
बातम्या आणखी आहेत...