आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सोन्याची 12 बिस्किटे जप्त, महिला अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दुबई ते पुणेदरम्यान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार्‍या एका महिलेकडून कस्टम अधिकार्‍यांनी चार लाख 13 हजार रुपये किमतीची 12 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. शंकुतला नरेश जैन असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
रविवारी दुबईवरून आलेल्या एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटच्या कचरापेटीत कस्टम अधिकार्‍यांना 12 सोन्याची बिस्किटे असलेले एक पाकीट आढळून आले. त्यांनी चौकशी केली असता, विमान धावपट्टीवर उतरत असताना, एक महिला टॉयलेटमध्ये गेल्याची माहिती मिळाली. सदर महिला शकुंतला असल्याचेही निष्पन्न झाले. ‘आपण कॅरियर म्हणून काम करत असून विमान उतरत असताना सदर सोन्याची बिस्किटे असलेले पाकीट टॉयलेटमध्ये फेकून दिले,’ अशी कबुली महिलेने पोलिसांकडे दिली. या महिलेवर कस्टम अँक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर महिलेने कोणाच्या सांगण्यावरून विदेशातून सोने आणले, ती कोणासाठी काम करत होतील याबाबत कस्टमचे अधिकारी व पोलिस अधिक तपास करत आहेत.