आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Kilograms Gold Looted From Idbi Bank Branch Near Pune

पुणे-सोलापूर महामार्गावर आयडीबीआय बँक फोडून 12 किलो सोने चोरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आयडीबीआय बँकेची एक शाखा फोडून चोरट्यांनी जवळपास 12.7 किलो सोने चोरुन नेल्‍याचा प्रकार घडला आहे. पुणे-सोलापूर राष्‍ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्‍यात पळसदेव येथील ही शाखा आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या बँकेच्‍या नुतनीकरणाचे काम सुरु होते. त्‍यासाठी राजस्‍थानमधील काही कारागिर काम करीत होते. आयडीबीआयच्‍या पुणे येथील मुख्‍य शाखेकडून यासंदर्भात कंत्राट देण्‍यात आले होते. काम अंतिम टप्‍प्‍यात होते. प्‍लॅस्‍टर ऑफ पॅरीसचे काम सुरु होते. परंतु, चोरट्यांनी हीच संधी साधून डल्‍ला मारला. या राजस्‍थानी कारागिरांवरच संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे. चोरण्‍यात आलेले सोने जवळपास 4 ते 5 कोटी रुपये किंमतीचे आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. घटनास्‍थळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून त्‍यांनी शोधमोहिम सुरु केली आहे.