आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Thousand Police Very Soon Recruit Prithiviraj Chavan

राज्यात 12 हजार पोलिसांची भरती केली जाणार - पृथ्‍वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यातील पोलिसांचे कमी मनुष्यबळ लक्षात घेता पोलिसांची संख्या वाढवण्याकरिता कॅबिनेट बैठकीत पाच वर्षांचा दीर्घकालीन भरती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात सुरुवातीला 12 हजार पोलिस कर्मचा-यांची भरती लवकरच केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
आमदार मोहन जोशी यांचे आमदार निधीतून वाहतूक पोलिस प्रशिक्षण व नागरिकांच्या रस्ता सुरक्षा उपक्रमासाठी येथे बांधण्यात आलेल्या ‘संस्कार भवन’ या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पोलिस आयुक्त गुलाब पोळ, सहपोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल व वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, पुणे राज्यातील झपाट्याने वाढणारे शहर असून शहरातील समस्या गंभीर बनत आहेत. दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहराकरिता दहा हजार 183 कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प मान्य करण्यात आला आहे.
जवाहरलाल नेहरू पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पायाभूत सोयी-सुविधा वाढवण्याची कामे पुढील टप्प्यात हाती घेतली जाणार आहेत. वाहतूक ही पुण्यातील सर्वात मोठी समस्या बनली असून वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, नवीन जागा उपलब्ध करून देणे व वाहतूक वाहने उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुणे शहर झपाट्याने वाढत असले तरी पुण्याची मूळ संस्कृती टिकवण्याकरिता प्रयत्न केले गेले पाहिजेत.
मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना टाळले
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी गुन्हे शाखेचे पोलिसांना हल्लेखोर अथवा सूत्रधार सापडले नाहीत. पुणे पोलिस दैवी चमत्काराच्या प्रतीक्षेत असून त्यांच्याकडे ठोस माहिती उपलब्ध नाही. मुख्यमंत्री पोलिस आयुक्त कार्यालयात आल्यावर त्यांना डॉ. दाभोलकर प्रकरणाबाबत माध्यमांकडून प्रश्न विचारले जाणार हे नक्की होते. त्याचा अंदाज आल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना टाळत पुण्यातील एका लग्न सोहळ्यासाठी जाण्यासाठी घाईगडबड केली.