आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८ फेब्रुवारीपासून बारावी; 7 मार्चपासून दहावीची परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा 7 मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान घेतली जाणार आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरही याची माहिती देण्यात आली आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना योग्य वेळी उपलब्ध करून दिले जाईल. अन्य संकेतस्थळे वा अन्य यंत्रणांनी छापलेली दोन्ही परीक्षांची वेळापत्रके ग्राह्य धरू नयेे. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा याविषयी स्वतंत्रपणे कळवले जाईल, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...