आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीेचे परीक्षा अर्ज २४ ऑक्टोबरपर्यंत भरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन आवेदनपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर भरायची आहेत. त्यासाठी २४ ऑक्टोबरही अंतिम तारीख आहे. ऑनलाइन आवेदनपत्रे बोर्डाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरायची आहेत.
नियमित शुल्कासह आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने शाळा वा कनिष्ठ महाविद्यालयांत भरण्याची तारीख १ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०१६ अशी आहे. विलंब शुल्कासह ही तारीख २४ ऑक्टोबरपर्यंत आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या चलन व प्रत्येकाच्या अाधार कार्डसह बाेर्डाकडे जमा करण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे, असे बोर्डाने कळवल आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आवेदनपत्रामध्ये शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे, असेही बोर्डाने कळवले.
बातम्या आणखी आहेत...