आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीच्या निकालात 2% वाढ, औरंगाबाद विभाग 89.83 टक्के निकालासह चौथ्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. उत्तीर्ण मुलींची संख्या ९३.०५  टक्के असून मुलांची संख्या ८६.६५ टक्के आहे. बारावीचा राज्याचा निकाल ८९.५० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २ टक्के वाढ झाली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका ९ जून रोजी महाविद्यालयात मिळतील तसेच गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी ३१ मेपासून ९ जूनपर्यंत अर्ज करता येतील.
 
विभागनिहाय निकाल...
> कोकण विभाग 95.20 टक्के
> पुणे विभाग 91.16 टक्के
> कोल्हापूर विभाग 91.40 टक्के
> औरंगाबाद विभाग 89.83 टक्के
> नागपूर विभाग 89.50 टक्के
> अमरावती विभाग  89.12 टक्के
> नाशिक विभाग 88.22 टक्के
> लातूर विभाग 88.22 टक्के
> मुंबई विभाग  88.21 टक्के
- बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.09 ट्क्क्याने वाढले आहे. 
 
शाखानिहाय निकाल...
> विज्ञान शाखा  - 95.85 टक्के
> कला शाखा  - 81.91 टाक्के
> वाणिज्य शाखा  - 90.57 टक्के
> व्यवसाय अभ्यासक्रम  - 86.27 टक्के
 
बारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून...
बारावीच्या परीक्षेला यंदा 15 लाख पाच हजार 365 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा बारावीच्या परीक्षा उशिरा सुरू झाल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तपासणीचे काम सुरळीत झाले. मात्र त्यामुळे निकालाला जरा वेळ लागल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. बारावीची पुरवणी परीक्षा 11 जुलैपासून सुरू होईल, असेही पाटील म्हणाले. 

सीआयएससीई दहावीत पुण्याची मुस्कान पहिली 
सीआयएससीईने सोमवारी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केले. दहावीत पुण्याची मुस्कान अब्दुल्ला पठाण बंगळुरूचा अश्विन राव 99.04 टक्के गुणांसह प्रथम आले आहेत. बारावीत कोलकात्याची अनन्या मैती ही 99.05 % गुणांसह प्रथम आली. बारावीत 96.47 % विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीचा निकाल 98.53 % लागला. 
 
हे ही वाचा...
 
पुढील स्लाइडवर वाचा, बारावी निकाल - कॉपीमुक्तीनंतर मराठवाड्यात निकालाच्या टक्क्याचा चढता आलेख...
बातम्या आणखी आहेत...