आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बारावी’च्या निकालाचे नको टेन्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात असहकार्य करण्याचा इशारा शिक्षक- मुख्याध्यापकांनी दिला असला तरी विद्यार्थी-पालकांनी या बाबीकडे मुळीच लक्ष देऊ नये. त्यांनी निश्चिंतपणे परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे. बारावीचा निकाल वेळेतच लागेल,’ अशी ग्वाही राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी शुक्रवारी दिली.
काही महिन्यांपूर्वीच विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या तोंडावर पुन्हा शासनाला धारेवर धरण्यासाठी उत्तरपत्रिकाच न तपासण्याचा इशारा दिलाय. उत्तरपत्रिका तपासणीच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकांवरही शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने विद्यार्थी-पालकांची काळजी वाढली आहे.
यासंदर्भात म्हमाणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, ‘ज्या मागण्यांसाठी शिक्षक असहकार्याच्या पवित्र्यात आहेत, त्या सर्व मागण्या राज्य शासनाने यापूर्वीच मान्य केल्या आहेत. त्यासंदर्भातला जीआर निघणे हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. माझ्या माहितीप्रमाणे जीआर काढण्याची प्रक्रियादेखील सुरू असून लवकरच तो निघेल. या सर्व प्रकाराचा कोणताही परिणाम उत्तरपत्रिका तपासण्यावर होऊ दिला जाणार नाही. निकाल निर्धारित वेळेतच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
245 पथके तैनात
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सात याप्रमाणे राज्यात 245 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच परीक्षा केंद्राच्या परिसराचे चित्रीकरणही केले जात असल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले.