आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिजिक्सची फेरपरीक्षा नाहीच; उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाचा पेपर खूप कठीण होता, अभ्यासक्रमाबाहेर प्रश्न विचारण्यात आले होते, असा आरोप करत या विषयाची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी होत आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ती साफ फेटाळून लावली. एखादा पेपर अवघड गेला की त्याची पुन्हा परीक्षा घेण्याचा चुकीचा पायंडा मंडळ पाडणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मंडळाचे अध्यक्ष सज्रेराव जाधव यांनी शुक्रवारी दिला.

भौतिकशास्त्राचा पेपर भाग एक व भाग दोन मिळून 70 गुणांचाच होता आणि त्यासाठी तीन तासांचा अवधी पुरेसा आहे. गेल्या वर्षीपर्यंत या विषयांचे पेपर प्रत्येकी 40 गुणांचे होते आणि ते वेगळ्या दिवशी घेतले जात. या वर्षीपासून ते प्रत्येकी 35 गुणांचे असून, एकाच वेळी घेतले गेले. वेळेबाबत विद्यार्थ्यांकडून होत असलेली तक्रारही चुकीची आहे, कारण अकरावीपासून विद्यार्थी याच पद्धतीने हे पेपर सोडवतात. त्यांचे मूल्यमापन कसे होणार आणि आराखडा कसा आहे, हे महाविद्यालयांना आधी कळवलेले असते, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.