आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकाल दोन जून रोजी, गुणपत्रिका 10 जूनपासून मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. 10 जूनपासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी गुरुवारी दिली. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण तसेच गुणपत्रिकेची प्रिंटआऊट संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. गुणपडताळणीसाठी 20 जूनपर्यंतची मुदत असेल. श्रेणी वा गुणसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2014 व मार्च 2015 अशा दोन संधी मिळतील. उत्तरपत्रिकेची छायाप्रतही शुल्क भरून मागवता येईल. पुनर्मूल्यांकन निकालापासून पाच दिवसांत करता येईल.
निकालासाठी संकेतस्थळे
एसएमएसवरूनही निकाल
बीएसएनएलच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये MHHSCअसे 57766 या क्रमांकावर पाठवल्यास निकालाचा एसएमएस मिळेल.