आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Years Lod Boy Burnt Alive Two Unknown Person Near Chakan, Pune

पुणे: 13 वर्षाच्या मुलाला अज्ञातांनी जिवंत जाळले, चाकणजवळील घटना!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील कोरेगाव खुर्द (ता. खेड) गावात एका 13 वर्षाच्या मुलाला अज्ञात दोन व्यक्तींनी जिंवत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाश संदीप महाळुंगकर असे या मृत मुलाचे नाव आहे. आकाश इयत्ता सातवीत शिकत होता.
याबाबतची माहिती अशी की, रविवारी पहाटे आकाश प्रात:विधीसाठी घराच्या पाठीमागील शेतात गेला होता. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या दोन अज्ञांत व्यक्तींनी आकाशच्या आंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. आकाशला पेटवून दिल्यानंतर तो घराकडे मोठ्याने ओरडत पळाला. मात्र, अज्ञातांनी आकाशला धरून त्याच्या संपूर्ण शरीरावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याने आकाशचे संपूर्ण शरीर जळत होते. घरातील सर्वांनी त्याला विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आकाश तोपर्यंत 100 टक्के भाजला होता. त्यानंतर त्याला तत्काळ पुण्यातील ससूनमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आकाशला भल्या पहाटे नेमके कोणी पेटवून दिले व त्याचे कारण काय याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. आकाशला जिळंत जाळण्यामागे काहीतरी मोठे कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण भल्या पहाटे रॉकेल घेऊन त्याला पेटवून दिले म्हणजे यामागे मोठी तयारी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.