आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांच्या वादामुळे चौदा घंटागाड्या बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऐनपावसाळ्यात कचरा कुजून दुर्गंधी अनारोग्याला आमंत्रण मिळण्याची भीती असतानाही पंचवटी विभागात मात्र दाेन ठेकेदारांच्या वादात १४ घंटागाड्यांचे काम बंद पडल्याची घटना मंगळवारी घडली. त्यामुळे परिसरात घंटागाड्या पाेहोचल्यामुळे नागरिकांच्या प्रक्षाेभाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. दुसरीकडे पावसात किमान डाेके भिजण्यापासून वाचवण्याकरिताही आवश्यक साहित्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही असहकार पुकारल्याचे वृत्त आहे.
घंटागाडी ठेकेदार कर्मचाऱ्यांमधील वादात शहरातील कचरा उचलण्याची प्रक्रिया ठप्प होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे आता आंदाेलनाला एकप्रकारे बळ मिळत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी एका ठेकेदाराला ५० हजारांचा दंडही ठोठवण्यात आला. मात्र, त्यानंतरदेखील काेणीही बाेध घेतलेला दिसत नाही. म्हणूनच की काय, पावसाळा सुरू असताना पंचवटी विभागात अचानक घंटागाड्यांचे कामकाज थांबवले गेले. वास्तविक पावसाळ्यात घराबाहेर कचरा साचवून ठेवता तातडीने त्याची विल्हेवाट लावण्याकडे नागरिकांचा कल असतो. घराबाहेर कचरा टाकल्यास कुजून सडण्याची भीतीही असते. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात घंटागाडीची अधिक प्रतीक्षा असते. दुसरीकडे मात्र घंटागाडी कर्मचाऱ्यांनी तारखेला मिळणारे वेतन महिना संपण्याची वेळ आली, तरी मिळत नसल्यामुळे कामकाज बंद पाडले. परिणामी २७ पैकी १४ घंटागाड्यांचे कामकाज बंद राहिले. जवळपास १४० कर्मचाऱ्यांचे कामकाज बंद झाल्याचे वृत्त असून, आरोग्य विभागाने त्याची चौकशी सुरू केली आहे.
रेनकोट नाही अन् गमबूटही...
घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन तर मिळाले नाहीच. मात्र, पावसाळ्यात भिजण्यापासून बचावाकरिता रेनकाेटही मिळाले नसल्याची तक्रार आरोग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्याकडे आली आहे. कचऱ्यात उभे राहण्याची वेळ आली असून, पायांचे संरक्षण करण्याकरिता गमबूटही मिळाले नसल्याच्याही तक्रारी आहेत. आरोग्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगत विभागीय स्वच्छता िनरीक्षकांमार्फत तातडीने ठेकेदारांना समज देण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. बुधवारपासून घंटागाड्यांचे कामकाज सुरळीत झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...