आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात 14 तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहराजवळील पिंपळे सौदागर, सांगवी व हिंजवडी परिसरात पोलिसांनी विविध हॉटेल्सवर छापे टाकून वेश्याव्यवसायातून 14 मुलींची सुटका, तर 13 दलालांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार साथीदारांसह फरार आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सुमीतकुमार गोपाळ (32, रा. पुणे), सुजत जेकब मॅथ्यू (30), ए. बी. थॉमस (29, रा. दोघेही केरळ), दीपकिरण छेत्री (26), हेमंतसिंग बहादूर छेत्री (24), रणजित बिरखा छेत्री (21), अजय लोकबहादूर गिरी (19) व देवेंद्र राम मोहंती (24), सर्वजण रा. आसाम) प्रकाश पन्नालाल चौधरी (24, रा.राजस्थान), प्रफुल्ल भास्कर बेंद्रे (28, रा. पाथर्डी, अहमदनगर), शशी ऊर्फ प्रीतम लोहार (25, रा. पुणे), विशाल काटे, हॉटेल व्यवस्थापक राजाराम पाडाळे अशा 13 दलालांना अटक केली आहे, तर बाबू, विवेक व रामू भंडारी हे आरोपी पसार झाले आहेत. सुटका झालेल्या मुली 20 ते 26 वयोगटातील आणि कोलकाता, मुंबई व पुणे येथील आहेत.

दिल्ली येथून बेपत्ता झालेली एक तरुणी पुणे शहराजवळील पिंपळे-सौदागर येथे वेश्याव्यवसायात अडकल्याचे समजल्याने त्यांचे कुटुंबीय पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांना भेटण्यास आले होते. तरुणींची सुटका करण्यात यावी अशी मागणी त्यांनी उमाप यांच्याकडे केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अस्लम शेख यांच्या पथकाने सदर तरुणीचा शोध घेत शिवार गार्डन येथे एक अल्टो कार पकडली. यातून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका करत दलाल अजय गिरी, देवेंद्र मोहंती व प्रीतम लोहार यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या चौकशीतून इतर दलालांची नावे समजली.नंतर पोलिसांनी बुधवारी रात्नी हिंजवडी, सांगवी व पिंपळे-सौदागर येथे हॉटेलवर छापे टाकले.

त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी यांच्या पथकाने ताथवडे येथील योगी हॉटेलवर छापा टाकून पाच मुलींची सुटका करत हॉटेल व्यवस्थापकास अटक केले. मात्न तीन दलाल यावेळी पसार झाले. सांगवीचे पोलिस उपनिरीक्षक एल.एन.सोनावणे यांनी हॉटेल सौदागर येथे छापा टाकून तीन मुलींची सुटका केली तर सात दलालांना अटक केली. त्यानंतर सदर पथकाने हॉटेल साईदीप येथे छापा टाकून तीन मुलींची सुटका करत दोन दलाल व हॉटेल व्यवस्थापकास अटक केली.