पुणे- पुणे-बंगळुरू महामार्गावर आज सकाळी साता-याजवळ क्रुजर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. याचबरोबर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील परळे गावांजवळ आज सकाळी जीपने ट्रकला जोरदार धडक दिली. यात जीपमधून प्रवास करीत असलेले 11 जण जागीच ठार झाले. जखमींना साता-यातील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीपमधून सुमारे 25 जण प्रवास करीत होते.
जीपमधील सर्व प्रवासी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील रहिवाशी आहेत. हे सर्व जण आज सकाळी सकाळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जात होते. मात्र, कोल्हापूरकडे जात असताना मध्येच साता-याजवळ जीपने ट्रकला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. अपघाताची तीव्रता जबरदस्त असल्याने महामार्गावर कित्येक किलोमीटर वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुढे पाहा, कसा झाला अपघात...