आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे फिल्म फेस्टिव्हल आजपासून, 65 देशांतील 280 चित्रपट पाहायला मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 14 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2016 चे आज उद्घाटन होत आहे. आजपासून सुरु होणा-या हा महोत्सवात 65 देशांतील 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत. आज सायंकाळी चार वाजता कोथरूडमधील सिटी प्राईड थिएटरमध्ये उद्घाटन सोहळा पार पडेल. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी ख्यातनाम अभिनेता सौमित्र चटर्जी, दिग्दर्शक श्याम बेनेगल, अनिमेटर राम मोहन आणि संगीतकार उत्तम सिंग यांचा गौरव करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या मान्यवरांचा सन्मान होत आहे, अशी माहिती पिफचे संचालक व अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
आठ दिवस सिने रसिकांची चांदी
आजपासून पुढील 8 दिवस सिने रसिकांना विविध देशातील व विविध भाषांतील चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. आजपासून (14 जानेवारी) पुढील 8 दिवस म्हणजेच 21 जानेवारीपर्यंत विविध 14 थिएटरमध्ये 280 सिनेमे दाखवले जातील. आजच्या उद्घाटनाच्या दिवशी मेक्सिकोमधील 'द थिन येलो लाईन' हा चित्रपट दाखवला जाईल.
पिफ नोंदणीला यंदा थंडा प्रतिसाद-
पिफ महोत्वसाला यंदा थंडा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत केवळ 3500 लोकांनीच नोंदणी केली आहे. तर गेल्या वर्षी हाच आकडा 9800 लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी लोकांनी प्रतिसाद दिला आहे.
मराठी साहित्य संमेलनाचा परिणाम
पिफची तारखी आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 जानेवारीपासून 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत आहे. त्याचा फटका पिफ नोंदणीला बसल्याचे स्पष्टपणे जाणवते. पुण्यातील लोक चित्रपटाएवढेच साहित्यावर प्रेम करतात. त्यामुळे दरवर्षी भरणा-या पिफ पेक्षा पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावावी असा विचार सामान्यांनी केल्याचे दिसून येत आहे. जब्बार पटेल यांनी मात्र संमेलन आणि नोंदणी कमी याचा संबंध नाही असे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...