आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: 6 वर्षांपासून दुखत होते पोट, ऑपरेशन केल्यानंतर निघाला तब्बल 15 किलोंचा गोळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड - येथे एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तब्बल 15 किलोग्रॅमचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. तिला गेल्या 6 वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. कालांतराने तिच्या पोटदुखीसह पोटाचा आकार सुद्धा वाढत गेला. पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 3 तास झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तब्बल 15 किलोंचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. 
 
 
काय होता आजार?
- शासकीय रुग्णालय म्हटलं की सगळयाच्या मनात भीती असते, पिनोरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयांमध्ये देखील रुग्णणचे हाल होत असल्याच्या बातम्या नेहमी झळकतात. मात्र, आज या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक मोठी सर्जरी करून YCM च्या उपचार यंत्रणेवरचा विश्वास मजबूत केला आहे. 
- ओवरीसिस्ट असे या आजाराचे नाव आहे. महिला वयात येत असताना होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे हा रोग उद्भवतो. 
- तरीही या रोगाचे प्रमाण कमी आहे. या रोगात गर्भशयाला एक गाठ तयार होते. महिलांना होणारी ही गाठीचे वजन सहसा  200 ते 300 ग्रॅम एवढे असते. मात्र, येथील रुग्ण लक्ष्मीबाई यांच्या पोटात तब्बल 15 किलोंचा गोळा आढळून आला आहे.
 

डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक
- रोग समजल्यानंतर लक्ष्मीबाई यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल झाल्या. संजय पाडाले (वरिष्ठ सर्जन), पुष्कर गालब (सर्जन), सचिन, राहुल आणि राजेश गोरे (भूलतज्ञ) यांच्या टीमने यशस्वीरित्या ही शास्त्रक्रिया केली आहे. 
- यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पार पडलेली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. याबद्दल सर्वत्र डॉक्टरांच्या पथकाचे कौतुक केले जात आहे. 
 
 
डॉ. पाडाळे म्हणाले...
25 वर्षांच्या सर्जरी करिअरमध्ये अशा प्रकारचा गोळा पाहिलेला नाही. यशस्वी शस्रक्रिया करून हा गोळा काढण्यात आला आहे. आणि महिलेची तब्येत सुद्धा स्थिर आहे. अशा प्रकारचा गोळा हा खूप कमी प्रमाणात आढळतो. या पूर्वी आफ्रिकेत एका 30 वर्षीय महिलेच्या पोटात 50 ते 60 किलोंचा गोळा आढळला होता. पोटात असा गोळा तयार झाल्याने श्वसनाचा त्रास, रक्तस्राव आणि इतर समस्या उद्भवतात.
बातम्या आणखी आहेत...