पुणे- पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील तळेगाव रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी एका लाल रंगाच्या बेवारस सुटकेसमध्ये 16 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या बॅगमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानकातील प्रवाशांनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॅग ताब्यात घेतली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळून आला.
या मुलीचा तीन ते चार दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसेच तिची हत्या केल्याचे दिसून येत आहे. तिच्या शरीराचे तुकडे करून एका बॅगमध्ये भरून बेसावधपणे तळेगाव रेल्वे स्थानकात ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. ही बॅग सकाळी 10.30 नंतर ठेवली असावी असे सांगितले जात आहे. मात्र दुपारी ही बाब लक्षात आली. पोलिस अधिक चौकशी करीत आहेत.