आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई काम करीत असलेल्या शाळेत गळफास घेऊन मुलीची आत्महत्या, घटना संशयास्पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर (खेड) परिसरातील एका अंगणवाडीत मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. रेश्मा भिसे (16) असे मृत तरुणीचे नाव असून ती इयत्ता 12 वी शिकत होती. दरम्यान, पोलिसांना न कळवता कुटुंबीयांनी तिचा अंत्यसंस्कार उरकल्याने आहत्येविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

रेश्मा वाडा गावात आई भावासोबत राहत होती. तिची आई धुण्या-भांड्याची कामे करून अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करत होती. आई काम करत असलेल्या अंगणवाडीतच रेश्माने गुरुवारी सायंकाळी गळफास घेतला. घटनेनंतर तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर थोड्याच वेळात कुटुंबीयांनी नातेवाईकांना बोलावून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, रेश्माच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले नाही. तसेच तिचे शवविच्छेदन न करता तातडीने अंत्यसंस्कार केल्याने सदर आत्महत्या संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले.