आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला; अत्याचार करुन हत्या केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चाकणमधील धामणे येथील एका शेतात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी वर्तवला आहे.

 

सूत्रानुसार, धामणे येथील शेतात 1 डिसेंबरला आईसोबत मनिषा (नाव बदलले आहे) काम करत होती. सायंकाळी 4 च्या सुमारास ती पाणी आणायला गेली, परंतु ती परत आलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला जात होता. चाकण पोलिसांत तिच्या अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता. त्या दिशेने तपास सुरू होता. परंतु, आज (सोमवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास शेतात तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला.

 

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे. रिपोर्ट आल्यानंतर मनिषासोबत काय घडले, हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...