आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरा महिन्यांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला: पुणे जिल्ह्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोळेवस्ती येथील बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या रोहनला वाचविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न सुरू होते. - Divya Marathi
लोळेवस्ती येथील बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या रोहनला वाचविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
पुणे/बारामती- अठरा महिन्यांचा राहन यादव हा मुलगा खेळता- खेळता बोअरवेलच्या खड्ड्यामध्ये पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील माळशिरस -नायगाव रस्त्यावरील लोळेवस्ती येथे घडली. सहा तासांनंतरही या मुलाची हालचाल सुरू होती, रात्री उशिरापर्यंत त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेच्या निमित्ताने, काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘प्रिन्स’ची व त्याला वाचवण्यासाठी रात्रभर सुरू असलेल्या धडपडीची सर्वांना आठवण झाली.

लोळेवस्ती येथील राहुल साहेबराव यादव या शेतकऱ्याने आपल्या घराजवळ सुमारे ३०० फूट खोल बोअरवेल खोदले होते, मात्र त्याला पाणी लागले नाही. त्यामुळे राहुल यांनी या बोअरवेलवर रिकामे पोते झाकण म्हणून ठेवले होते. राहुल यांच्या पत्नी त्यावर ठेवण्यासाठी दगड आणायला गेल्या, तेवढ्यात या दांपत्याचा मुलगा रोहनचा खेळता- खेळता पोत्यावर पाय पडला व तो बोअरवेलमध्ये पडला. सुदैवाने तो २० फूट खोलीवरच अडकून बसला. या घटनेची माहिती कळताच घाबरलेल्या यादव दांपत्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, यश न आल्यामुळे अखेर प्रशासनाला माहिती देण्यात आली.

रात्रभर युद्धपातळीवर प्रयत्न
पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले की, ‘अग्निशामक दलाचे एक पथक गावात दाखल झाले. रोहन ज्या खड्ड्यात पडला आहे, त्याच्या शेजारीच समांतर असा २० ते २२ फूट खोल खड्डा जेसीबी, पोकलेनच्या साह्याने खोदण्यात आला. राष्ट्रीय अापत्ती राखीव दलाच्या (एनडीआरएफ) पथकालाही तातडीने पाचारण करण्यात ओले असून रात्री उशिरा ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. खड्ड्यात सोडलेल्या कॅमेऱ्याच्या आधारे रोहनची हालचाल दिसत आहे. तसेच या बोअरवेलमध्ये ऑक्सिजन सोडण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला सुखरूप खड्ड्याबाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.