आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडिशनसाठी गेलेल्या तरुणीसोबत घडले असे काही; सोशल मीडियावरुन मिळाली होती माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये चित्रपटाच्या ऑडीशनसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीला धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. दिग्दर्शकानेच विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार काळेवाडी येथे घडला आहे. हा प्रकार रविवारी घडला. आहे. अप्पा पवार अस या आरोपीचे नाव असून अद्याप तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला नाही. 
 
चित्रपटाच्या ऑडिशनसाठी एका तरुणीला सोशल मीडियावरून माहिती मिळाली होती. ही तरुणी पुण्यामध्ये शिकत असून  काळेवाडी तापकीर चौक येथे चित्रपटाची ऑडीशन असल्याचे तिला समजले होते. त्या माहितीवरून तिने संपर्क केला असता आजची ऑडिशन रद्द झाली असून तू उद्या ये असा एसएमएस तिला पाठवण्यात आला. त्यानुसार संबंधित मुलगी रविवारी (6 ऑगस्ट) रोजी ऑडिशनला आली असता दिग्दर्शकाने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच तिला इतर चित्रपटात काम देतो असे ही आमिष दाखवले. या प्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात अप्पा पवार विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे. अद्याप पोलिसांना पवार सापडला नसून वाकड पोलिस तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...