आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Years Old Girl Died In Pune, Pmpml Bus Thrashed Her

पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत तरूणी ठार, मृतदेह पाऊण तास रस्त्यावरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलावर आज दुपारी 12 च्या सुमारास पीएमपीएमएलच्या बसने एका तरूणीला धडक दिली. या अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाला. सुप्रिया सोपान शिळमकर असे मृत तरूणीचे नाव आहे.
29 वर्षीय तरूणी सुप्रिया सिंहगड रोडकडून पुण्याच्या दिशेने येत होती. त्यावेळी तिला पाठीमागून आलेल्या पीएमपीएमएलच्या बसने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचे पुढचे चाक तरूणीच्या डोक्यावरून गेल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर तब्बल 45 मिनिटे सुप्रियाचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. मात्र, कोणीही पुढे सरसावले नाही.
अपघातानंतर बघ्यांची गर्दी पण मदत नाही-
सुप्रियाच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर तेथे बघ्यांची गर्दी झाली. काही वेळाने पोलिसही आले. मात्र, तिचा मृतदेह उचलण्यासाठी तब्बल पाऊण तासांनी रूग्णवाहिका आली. त्यावेळी दुपारची वेळ होती तर रस्त्यावर फुल्ल ट्रॉफिक झाले होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर महापालिकेच्या रूग्णवाहिकेने मृतदेह हालवला. सुप्रियाने डोक्यावर हेल्मेट घातले होते. मात्र, थेट चाकच डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर बघा, असा तब्बल पाऊण तास भरधाव रस्त्यावर पडून होता मृतदेह....