आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्‍या निकालात मुलींचीच बाजी; 193 विद्यार्थ्यांना 100% गुण; तरीही टक्केवारी घसरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर केला. एकूण निकाल  ८८.७४ टक्के इतका लागला आहे. याही वेळेस विद्यार्थिनींनी यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. ९१.४६ % मुली, तर ८६.५१ % मुले यशस्वी झाली. यंदा तब्बल १९३ विद्यार्थ्यांना १०० % गुण मिळाले आहेत. गतवर्षी ३९ मुलांना १००% गुण होते. यंदा निकालाचा टक्का ०.८२ टक्क्यांनी खाली आला. २०१६ मध्ये ८९.५६% निकाल लागला होता. गतवर्षी ५१ हजारांवर विद्यार्थी ९० टक्क्यांहून जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण ४८,४७० विद्यार्थ्यांवर आले आहे.

२४ जूनपासून गुणपत्रिका, फेरपरीक्षा १८ जुलैपासून
शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी दहावीची फेरपरीक्षा (पुरवणी परीक्षा) १८ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना २४ जूनला दुपारी तीन वाजता शाळेत गुणपत्रिका मिळेल. त्यासोबतच कलचाचणीचा अहवालही दिला जाईल. सरकारने नापासांसाठी १ जुलैपासून ६ महिन्यांचा कौशल्य सेतू कार्यक्रम आखला असून तो ८८ केंद्रांच्या १०५ तंत्रशिक्षण केंद्रात सुरू होईल. तो पूर्ण करणाऱ्यांना २ विषयाचे क्रेडिट गुण मिळतील. बाकीच्या विषयाची परीक्षा देऊन दहावी पासचे गुणपत्रक प्राप्त होईल.

कला, क्रीडा गुणांचा बोनस फायद्याचा!
दहावीत विद्यार्थ्यांना विशेषत: भाषा विषयांत पैकीच्या पैकी गुण कसे मिळतात, हा विषय शैक्षणिक वर्तुळात चर्चिला जात आहे. बेस्ट फाइव्हच्या जोडीला क्रीडा व कला क्षेत्रातील गुणांचा बोनस सुरू झाल्याने ‘पैकीच्या पैकी’ प्रकरण सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे वाढतेय टक्केवारी
खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तेजनासाठी गतवर्षीपासून विशेष गुण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्रेणीसुधार, गुणसुधार योजना आधीपासून सुरू आहेत. यात यंदापासून कलागुणांना उत्तेजन देता यावे म्हणून अधिक गुण देण्याची तरतूद केली आहे. त्यात गायन, वादन, नृत्य, चित्रकला आणि लोककला असे पर्याय आहेत. या सर्व पर्यायांमुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत आहे.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, विभागनिहाय निकाल...
बातम्या आणखी आहेत...