आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीची धडक बसल्याने पती-पत्नीचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोणी काळभोर येथे हॉटेलात जेवण करून पायी घरी परतत असलेल्या पती-पत्नीस दुचाकीने धडक दिल्याने त्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

सोलापूर-पुणे महामार्गावर हा अपघात घडला आहे. या अपघातात हनुमंत विठ्ठल लोखंडे (वय 45) व सुनीता हनुमंत लोखंडे (वय 42, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील चालक आकाश सरनाप्पा नागोरे व त्याचे मित्र गुरुप्रसाद बाळासाहेब जानराव, लक्ष्मण गुरुप्रसाद चव्हाण (तिघेही रा. उरुळी कांचन) हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत सुनीता लोखंडे यांचे बंधू धनंजय रामदास पोपळघट (रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 

 

 

 लोखंडे पतीपत्नी एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्गावर इरिगेशन कॉलनीनजीक आले असता त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या क्रमांक नसलेल्या दुचाकीने धडक दिली. यामुळे ते दोघे महामार्गावर व दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पाईपवर पडले.

 

 

स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने तेथील एका खासगी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच लोखंडे पती-पत्नी मृत झाले होते. दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकीचालक आकाश सरनाप्पा नागोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा अपघातात मृत्यू झालेले पती-पत्नी

बातम्या आणखी आहेत...