पुणे - खडकी येथील ऑर्डिनेन्स फॅक्टरीत गुरुवारी सकाळी दारुगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात 2 कर्मचारी जागेवरच ठार झाल्याची माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटक पदार्थ एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जात असताना हा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोट एवढा मोठा होता की दोन कर्मचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. स्फोटात मृत्युमुखी पडलेले अशोक काशिनाथ (52) आणि मारिया (48) हे अनुभवी कामगार होते.