आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरूरजवळ 46 एकर ऊस जळून खाक, वीजतारांमुळे लागली आग; 1 कोटींचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात वीज वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटनंतर लागलेल्या आगीत 46 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. यामुळे आठ-दहा शेतक-यांचे सुमारे 1 कोटींचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या आगीला महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ कारणीभूत आहे असा आरोप या शेतक-यांनी केला आहे. 30-40 वर्षाच्या जुन्या तारा शेतात आहेत. या तारा खाली आल्या आहेत. वारा आल्यास या तारा एकमेंकाला चिकटतात व त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागत आहेत. मात्र, एमएसईबी याकडे दुर्लक्ष करीत आहे. आमचे नुकसान झाल्याप्रकरणी एमएसईबीविरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात जाणार आहे. एमएसईबीने शेतक-यांची भरपाई द्यावी यासाठी लढा लढू असे संतप्त शेतक-यांनी सांगितले. यापूर्वीही एमएसईबीमुळे ऊस जळून खाक झालेल्या शेतक-यांना न्यायालयीन लढाईनंतर भरपाई मिळाली आहे.
पुढे पाहा, शिरूरमधील मांडवगण फराटा येथील ऊसाला लागलेल्या आगीचे छायाचित्रे...