आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण हाेण्यासाठी किमान १६ गुण घेणे आवश्यक झाले आहे. हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

सध्या दहावीची तोंडी परीक्षा २० गुणांची तर लेखी परीक्षा ८० गुणांची असते. बारावीला प्रात्यक्षिक व ताेंडी परीक्षा ३० गुणांची तोंडी व लेखी परीक्षा ७० गुणांची आहे. उत्तीर्ण हाेण्यासाठी किमान ३५ गुण आवश्यक असतात. त्यापैकी तोंडी परीक्षेत २० पैकी २० गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत केवळ १५ गुणच मिळवणे आवश्यक हाेते. मात्र आता नव्या नियमानुसार अशा पद्धतीने ३५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाणार नाही. त्याला उत्तीर्ण हाेण्यासाठी लेखी परीक्षेत किमान १६ गुण मिळवावेच लागतील.

या बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच ताे लागू हाेईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...