आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात \'थर्टी फर्स्ट\'ची जोरदार तयारी, यंगीस्तानला दीडपर्यंत थिरकता येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नववर्ष साजरी करण्यासाठी तरूणांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातही जोरदार तयारी सुरु आहे. शहरातील बड्या स्टार हॉटेलात तसेच उपनगरातील हॉटेल्समध्येही दोनशेपेक्षा जास्त पार्टींचे आयोजन करण्यात आले आहे. या पाटर्यांमध्ये कॉकटेल ड्रिंक, सर्व प्रकारचे फूडचा अस्वाद घेत डीजेच्या तालावर आणि सिनेतारकांसोबत थिरकता येणार आहे. यासाठी कपल्स किंवा सिंगल पासही हॉटेल्स व्यावसियाकांनी उपलब्ध केले आहेत. तसेच दोन हजारापासून ते दहा-पंधरा हजारांपर्यंत या पासची किंमत ठेवलेली आहे. दरम्यान, यंगीस्तानाला हा थर्टी फर्स्टही मजा मध्यरात्री दीडपर्यंतच लुटता येणार आहे. गृहमंत्रालयाने ही पहाटे पाचपर्यंत वेळ दिली होती मात्र स्थानिक प्रशासन ही वेळ कमी-अधिक करू शकते असे सांगितले होते. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव रात्री दीडपर्यंत पाटर्यांना परवानगी दिली आहे.
याचबरोबर प्रशासनाने रात्री लोक बाहेर पडतील व त्यांच्या सुरक्षेसाठी खास 30 पथकाची नेमणूक केली आहे. सुमारे दीडशे पार्टीआयोजकांनी प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे. मात्र आज दिवसभरात यात आणखी 50 आयोजकांची भर पडेल असे सांगण्यात आले.
पुढे वाचा, 2 लाख तळीरामांनी घेतला मद्य परवाना