आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन तरुणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नेरळहून पिंपरी येथे अाजीकडे राहण्यास आलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सहा जणांनी गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. पीडित तरुणीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर सौरभ शेट्टी, हर्षल भाटिया आणि नसीब शेख (सर्व रा. पिंपरी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचे तीन साथीदार फरार झाले आहेत.
 
पीडित तरुणी ही अाई-वडिलांसह नेरळ येथे राहते. काही दिवसांपूर्वी तरुणी ही पिंपरीतील अजमेरा काॅलनीत राहणाऱ्या अाजीकडे राहण्यास अाली हाेती. या वेळी आजीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने तरुणीशी ओळख निर्माण करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले.
 
तरुणाने याबाबत आपल्या पाच मित्रांना माहिती दिली. त्यांनीही तरुणीला गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला.  या घटनेनंतर  तरुणी आजारी पडली. त्यामुळे आजीने तिला तिच्या पालकांकडे नेऊन सोडले. पालकांनी तरुणीला रुग्णालयात  दाखल केल्यानंतर तिने झालेल्या प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी सहा तरुणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली, तर तीन जण फरार झाले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...