आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बालेवाडीत 24 झोपड्या जळून खाक, सिलेंडर स्फोटामुळे लागली आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील बालेवाडी येथील म्हातोबा नगर या झोपडपट्टी परिसरात गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 22 झोपड्या जळून खाक झाल्या. आज सकाळी आकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतेही जिवितहानी झाली नाही. मात्र, लाखोंचे नुकसान झाले तर अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडले.
आज सकाळी 11च्या सुमारास बालेवाडीतील म्हातोबा नगरात एका झोपड्डीतील घरात गॅस सिलेंडर लीक झाला. काही वेळात या सिलेंडरने पेट घेतला व बघता बघता आग लागली. आग लागताच मोठा स्फोट झाला. त्याचवेळी इतर झोपड्यातील सिलेंडर टाक्या बाहेर काढल्या. मात्र, तोपर्यंत सर्व झोपड्यांनी पेट घेतला होता. मात्र, बाकी सिलेंडर काढल्याने मोठा धोका टळला.
मराठवाड्यातील लोक व बांधकाम कामगार-
या म्हातोबा नगरात बहुतेक बांधकाम कामगार स्थायिक झालेले आहेत. सर्वांचे हातावर पोट आहे. कामावर गेल्यासच संध्याकाळी चूल पेटते. सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळ असल्याने तेथील लोक म्हातोबा नगरात विसावले आहेत. अनेक जण कामावर गेल्याने त्या सर्व गोरगरिबाचा संसार उद्धवस्त झाला आहे.
पुढे पाहा, आगीनंतर कशा झाल्या 24 झोपड्या जळून खाक झाल्या...