आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराकडून फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी- चिंचवड: शहरातील मोशी परिसरात प्रेमभंग झाल्याने एका तरुणीने आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी 7:30 च्या सुमारास समोर आली आहे. पूजा सुनील आल्हाट अस मयत तरुणीचे नाव आहे. सदर घटनेतील प्रेमी तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सुनील आल्हाट (वय-22, रा. आल्हाटवाडी मोशी) असे मयत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पूजाचा प्रियकर पंकज ऊर्फ अर्जुन कैलास सस्ते (वय 28, रा. मोशी याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
पूजा आणि पंकजचे गेल्या एक वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते. पूजाने लग्नाचा विषय काढल्याने गेल्या काही दिवसांपासून दोघांत दुरावा निर्माण झाला होता. त्याच मुळे पंकज पूजाशी बोलण्यास टाळाटाळ करत होता. सोमवारी (ता. 13) पूजा राहत्या घरातून सकाळी 11 वाजता घराबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत पूजा घरी आली नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घेत परिसर पिंजून काढला. मात्र ती मिळाली नाही. सकाळी शेतात गेल्यानंतर विहिरीजवळ तिचा मोबाईल आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचा संशय बळावला. तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान आले आणि सकाळी 7:30 च्या सुमारास तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
 
पंकज आणि पूजा यांचे व्हाट्सऍपवरील संभाषण मोबाईलमध्ये आढळून आले आहे. त्यात पूजाने पंकजला तू मला का फसवलेस असा उल्लेख केलेला आहे. पूजा ही सुशिक्षित होती. तसेच पंकजचे कापड्याचे दुकान आहे. एकाच गावात असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण जुळले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...