आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 23 Lakh Loot From Amazon.com Company's Employee In Pune

पुणे: amazon.comच्या कर्मचा-यावर प्राणघातक हल्ला करून 23 लाख लुटले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हिंजवडीतून एका कंपनीची रक्कम घेऊन जात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्याकडील 23 लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी विकास शहाजी नलावडे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नलावडे हे हिंजवडीतील अॅमेझॉन कंपनीत नोकरीस असून कंपनीत जमा झालेली रक्कम घेऊन ते कर्मचारी आशिष चक्रनारायण यांच्यासोबत बुलेटवरून जात होते. त्यांची दुचाकी वाकड उड्डाणपुलाजवळ आली असता चौघांनी त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 23 लाख रुपयांची रोकड लुटली. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.
संतोष माने प्रकरण; मृताच्या कुटुंबीयांना 22 लाख भरपाई
बेदरकारपणेएसटी चालवून चालक संतोष माने या माथेफिरूने समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मिलिंद गायकवाड यांच्या वारसांना 22 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सत्र न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी एसटी महामंडळाला दिला आहे. मिलिंद यांच्या पत्नी नंदिनी यांनी 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी याचिका दाखल केली होती. गायकवाड हे घटनेच्या दिवशी रिक्षाने जात असताना रिक्षाला मानेने चिरडले होते. यात ते ठार झाले होते.