आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 Thousand Crores In Education Sector Ramdev Baba

शिक्षण क्षेत्रात गुंतवणार २५ हजार काेटी, याेगगुरू रामदेवबाबांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एका ईस्ट इंडिया कंपनीने दीडशे वर्षे देशाला लुटले, हा अनुभव ताजा असताना विदेशी कंपन्यांसमोर पायघड्या अंथरून कसले ‘मेक इन इंडिया करणार’ असा सवाल करत योगगुरू व पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेवबाबा यांनी रविवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. स्वदेशी उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्याचे काम, हे खरे ‘मेक इन इंडिया’ ठरेल, असेही ते म्हणाले. दरम्यान,येत्या दहा वर्षात पतंजलीच्या वतीने देशभरातील शिक्षण क्षेत्रात २५ हजार काेटींची गुंतवणूक करण्याचा मानसही रामदेव यांनी बाेलून दाखवला.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (जितो) तर्फे आयोजित तीनदिवसीय जागतिक परिषदेचा समारोप रविवारी रामदेवबाबा यांच्या ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. रामदेवबाबा म्हणाले,‘जगभर मंदीचे वातावरण आहे. आपल्याकडे सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे विदेशी कंपन्या त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी भारतीय बाजारपेठेत उतरण्यास उत्सुक आहेत. याउलट देशातील उद्योगांना वाऱ्यावर सोडायचे आणि विदेशी कंपन्यांसाठी मात्र पायघड्या घालायच्या हे धोरण देशाला प्रगतीपथावर कसे नेणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. स्वदेशी कंपन्यांना सक्षम करणे आणि स्वदेशी उत्पादनांपुढे विदेशी कंपन्यांची रांग लागणे, हे खरे ‘मेक इन इंडिया’ आहे. पतंजलीच्या माध्यमातून आम्ही हाच विचार पुढे नेत आहोत. मी पतंजलीचा व्यवस्थापक नाही की संचालकही नाही. मिळणारा पैसा देशासाठीच वापरायचा, हा वसा घेऊन आम्ही या व्यापारसाखळीत उतरलो आहोत. प्रामाणिक काम आणि योग्य दाम व दर्जा जपल्यानेच पतंजलीला सर्वदूर पाठिंबा मिळत आहे. व्यापार, उद्योगात जैन समाजाचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.

यापुढे नुसती मंदिरे नको, शिक्षण संस्था उभारा
यापुढे भव्य मंदिरे, देवालयांपेक्षा नव्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व संस्था उभारा. आपल्या मुलांनी परकीय दूतावासांसमोर रांगा लावण्यापेक्षा परदेशी विद्यार्थ्यांनी योग, आयुर्वेद, शास्त्र, संस्कार शिकण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थांसमोर रांगा लावाव्यात, असा भारत आपल्याला घडवायचा आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.