आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात 25 वर्षीय आयटी इंजिनिअरची आत्‍महत्‍या, नाेकरीची खात्री नसल्‍याने दिला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चांगले शिक्षण घेऊनही दिवसेंदिवस राेजगाराच्या संधी कमी हाेत असताना अायटी क्षेत्रात माेठा पगार मिळत असल्याने अनेक जण संगणक अभियंता हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. मात्र, अायटी क्षेत्रात नाेकरीची खात्री नसल्याच्या नैराश्यातून आंध्र प्रदेशच्या एका संगणक अभियंत्याने हॉटेलमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील विमाननगर येथे गुरुवारी उघडकीस आली.   
 
गाेपीकृष्ण दुर्गाप्रसाद (२५) असे मृत तरुणाचे नाव अाहे. गाेपीकृष्ण हा मूळचा अांध्र प्रदेशचा रहिवासी असून त्याने यापूर्वी हैदराबाद व दिल्ली येथे अायटी कंपनीत काम केले. तीन दिवसांपूर्वीच ताे पुण्यातील एका अायटी कंपनीत  रुजू झाला. कंपनीने विमाननगर परिसरातील एका हाॅटेलमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था केली हाेती. बुधवारी पहाटे गाेपीकृष्णन याने हाॅटेलच्या बाल्कनीतून खाली उडी घेऊन अात्महत्या केली. घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत  घोषित केले. दरम्यान, खाेलीत अात्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून अायटी क्षेत्रात नाेकरीची शाश्वती नसल्याने आपण अात्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
 
पुढील स्‍लाइडवर...गोपाळकृष्‍णच्‍या खोलीमध्‍ये आढळलेली सुसाईड नोट...
बातम्या आणखी आहेत...