आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPDATE महाराष्ट्र: भरधाव टेम्पोने 2 चिमुरड्यांना ‍चिरडले, LED टीव्हीतून सोन्याची तस्करी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद/मुंंबई - नालासोपाऱ्यात सोमवारी सकाळी भरधाव टेम्पोने दोन चिमुरड्यांना चिरडले. अलमान शेख आणि आदित्य प्रजापती असे मृत मुलांची नावे आहेत. दोघे शाळेत जात होते.

नालासोपाऱ्यातील संतोष भुवनजवळ अलमान आणि आदित्य रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. इतर दोघे या अपघातात जखमी झा ले आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करत टेम्पोची तोडफोड केली. पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरु केला आहे.

दुसरीकडे, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने एक किलोपेक्षा जास्त सोने जप्त केले आहे. अबु धाबीवरुन आलेल्या एका प्रवाशाकडे LED टीव्हीत हे सोने सापडले आहे. या सोन्याची किंमत जवळपास 32 लाख आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... LED टीव्हीतून सोन्याची तस्करी, एअरपोर्टवर 1 किलो सोने  जप्त... पुण्यात विवाहितेची आत्महत्या; औरंगाबादेत 2 खंडणी बहाद्दरांना अटक

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...