आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11: अशी होती कसाबची अंत्ययात्रा, मरण्यापूर्वी हे होते त्याचे अंतिम शब्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली. - Divya Marathi
पुण्यातील येरवडा जेलमध्ये कसाबला फाशी देण्यात आली.

मुंबई/पुणे- मुंबईवरील हल्ल्याला आज 9 वर्ष झाली आहेत. या दहशतवादी हल्ल्यात पकडण्यात आलेला एक दहशतवादी अजमल कसाब याचे अंत्ययात्रेविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. दहशतवादी हल्ल्यानंतर 4 वर्षांनी कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी येरवड्यातील तुरूंगात फाशी देण्यात आली. 

 

असा झाला कसाबचा शेवट
20 नोब्हेबर 2012
- सजा सुनावण्यात आल्यानंतर कसाबला मुंबईतील आर्थर रोड जेलमधुन पुण्यातील येरवडा जेलमध्ये आणण्यात आले आणि तेथेच त्याला फाशी देण्यात आली. तेथेच त्याला दफनही करण्यात आले. 
- रात्री 1 वाजता : तीन गाडया आर्थर रोड जेलमधून बाहेर पडल्या. त्यात एक पांढरी स्कॉर्पिओ होती. यामध्ये सात कमांडो होते. ते सगळे जण पुण्यातील येरवडा येथे चालले होते.

- सकाळ झाल्यावर : डॉक्टरांनी सांगितले की कसाबची तपासणी पूर्ण झाली आहे. वजन, उंचीचे आकडे घेण्यात आले. त्याला नाश्ता आणि जेवण देण्यात आले. या काळात डॉक्टरांनी त्याच्यावर नजर ठेवली होती. 

- संध्याकाळी : कसाबची दाढी करण्यात आली आणि त्याचे केस कापण्यात आले. त्यानंतर त्याने आंघोळ केली. 
- रात्री : जेल अधिकाऱ्याने जेवण्यासाठी कसाबला काय आवडते, असे विचारले. कसाब म्हणाला, जे द्याल ते खाईल. त्यानंतर त्याला जेवण देण्यात आले. या जेवणात चपाती, डाळ, भात, कढी आणि कांदा होता. 

 

21 नोव्हेंबर 2012
- रात्री 1 वाजता : कसाब झोपण्यासाठी गेला
- पहाटे 4 वाजता : गार्ड कसाबला उठविण्यासाठी अंडा सेलमध्ये पोहचले. त्याला प्रार्थना करण्याविषयी विचारण्यात आले. त्याने यास नकार दिला. त्यानंतर कसाबने दोन कप चहा पिला.

- सकाळी साडेसहा वाजता : कसाबला फाशी देण्याच्या ठिकाणी नेण्यात आले. तो पुन्हा एकदा माफी देण्याबाबत बोलला.  
- सकाळी 7 वाजता : डॉक्टरांनी पुन्हा एकदा कसाबची तपासणी केली.
- सकाळी 7 वाजून 24 मिनिटे : कसाबला फाशी देण्यात आली. तत्पूर्वी कसाबने माफी मागितली. शिपाई बाळू मोहिते यांनी त्याला फाशी दिली. साहेब मला माफ करा, असे कसाब म्हणाला. फाशी दिल्यानंतर कसाबला 7 मिनिटे लटकून ठेवण्यात आले होते. त्याचा एक फोटो काढण्यात आला आणि निगेटिव्ह जाळण्यात आली. 

- सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी : कसाब शरीर फाशीच्या फंद्यातून काढण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.
- सकाळी 8 वाजता : त्याच्या मृत्यू प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली.
- सकाळी साडेआठ वाजता : कसाबचा मृतदेह दफन करण्यासाठी नेण्यात आला. मौलवींनी धार्मिक रितीरिवाजानूसार त्याचा दफनविधी केला.

 

हे होते कसाबचे अंतिम शब्द
- जेव्हा कसाबला फाशी देण्याची वेळ आली तेव्हा त्याला एका खास सेलमध्ये नेण्यात आले. तेथे काही पोलिस अधिकारी आधीच उपस्थित होते.
- त्याला विचारण्यात आली की तुझी काही अंतिम इच्छा आहे का? तुझ्या घरच्यासाठी तुला काही लिहायचे आहे का? त्यावर कसाबने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला फाशी देण्यासाठी उभे करण्यात आले. ठीक 7 वाजून 40 मिनिटांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. 
- तेथे उपस्थित असणाऱ्या काही सुत्रांनी सांगितले की कसाब म्हणाला, अल्लाह कसम, ऐसी गलती दोबार नही होगी।
 

 

 

बातम्या आणखी आहेत...