आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातून ३ महिला बेपत्ता, अपहरण झाल्याचा संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेजारील दोन महिलांना सोबत घेऊन दवाखान्यात गेलेल्या महिलेसह तीन जणी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सदर महिलांचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

प्रतिभा प्रकाश हजारे (वय २५), मंगला सिध्दार्थ इंगळे (२६) आणि विद्या दशरथ खाडे (२४) अशी बेपत्ता महिलांची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिभा हजारे यांचे पती प्रकाश बाबू हजारे (३०, रा.ओझरकरवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यापैकी दोन महिला खासगी नोकरी करत आहेत.

आम्हाला वाचवा, तिघींचा टाहो
सायंकाळी पाचच्या सुमारास मंगला इंगळे यांच्या पतीच्या मोबाइलवर विद्या खाडे यांच्या मोबाइलवरुन फोन आला. त्यावेळी तिघी रडत होत्या आणि आम्हाला वाचवा, असे ओरडत होत्या. गाडी चालकास गाडी थांबवण्यासाठी त्या विनवणी करत होत्या. त्यानंतर मात्र त्यांचा मोबाइल फोन बंद झाला. प्रकाश यांनी त्यानंतर अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाइल फोन बंदच होता.