Home »Maharashtra »Pune» 3 Year Old Boy Beaten By Teacher

शिकवणीत 3 वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण; पुणे पोलिसांनी घेतली नाही तक्रार

दिवय मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 20:35 PM IST

पुणे-गुरुग्राम येथील रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील 7 वर्षाच्या मुलाच्या खूनाचा प्रकार ताजा असतानाच पिंपळे गुरवमध्ये शिकवणीच्या बाईंनी 3 वर्षाच्या चिमुरड्याला लाकडी पट्टीने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. देव कश्यप असे या पीडित चिमुरड्याचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी याबाबत फिर्याद घेतली नसल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली आहे.
सांगवी पोलिसांचे चाललंय काय?
या प्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार करण्यासाठी मुलाची आई आणि वडील गेले असता तक्रार घेतली गेली नसल्याचे चिमुरड्याची आई सांगत आहे. बाईंनी चक्क लाकडी पट्टीने देवच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर जबर मारहाण केली आहे. त्याचे व्रण देखील अद्यापही आहेत. तसेच त्याचे डोळे सुजलेले आहेत. त्यामुळे चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. मात्र 3 दिवसांपूर्वी मारहाण केलेली सूज आणखी देखील उतरलेली नाही त्यामुळे कुटुंबीय घाबरले आहेत. या घटनेने शेजारी राहणारे नागरिक देखील भेदरले आहेत. सांगवी पोलिस देखील या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended