पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळे गुरव भागात शिकवणीच्या शिक्षकेने 3 वर्षाच्या चिमुरडीला मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी अखेर गुरुवारी सकाळी अटक केली. भाग्यश्री पिल्ले असे या खासगी शिकवणी घेणा-या शिक्षकेचे नाव आहे.
देव कश्यप नावाच्या नर्सरीतील मुलाला भाग्यश्री पिल्लेने लाकडी पट्टीने जबर मारहाण केली होती. यात देव कश्यप मुलाचे चेहरा-डोळ्यासह अंग सुजले होते. तीन दिवसापूर्वीची ही घटना आहे.
मात्र, देवच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षकेविरोधात तक्रार दाखल करून घेतली नव्हती, असा आरोप मुलाच्या आईने केला होता.
मात्र, या घटनेची माध्यमांत बातमी जोरात प्रसारित झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी शहाणपण सुचले आणि बुधवारी रात्री उशिरा पिल्ले हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
या मुलाचे वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई मजूरी करते. तीन दिवसांपासून मुलाच्या डोळ्यावर असलेली सूज अद्याप ओसरलेली नाही.