आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 year old Girl Declared Dead After Dental Procedure In Pune

रूट कॅनल करताना डॉक्टरचा निष्काळजीपणा, तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दाढेवर करण्यात येणा-या रुट कॅनलमध्ये निष्काळजी केल्याप्रकरणी एका तीन वर्षीय मुलीचा मुत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉक्टर विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अंकुर कुलकर्णी (फॅमिली डेंटल केअर, राहुलनगर, कोथरूड, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. निरंजन रेवतकर (वय 35, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे कोथरूड परिसरात फॅमिली डेंटल केअर या नावाचे क्लिनिक आहे. फिर्यादी सोमवारी आपल्या तीन वर्षाच्या मुलीच्या दाढेवर रुट कॅनल करण्यासाठी क्लिनिक मध्ये गेले होते. यावेळी सानवी हिच्या दाढेवर रुट कॅनल करण्यात आला. रुट कॅनल करताना निष्काळजीपणाने उपचार केल्यामुळे सानवी हीला त्रास सुरू झाला. या घटनेत ती मृत पावली. याप्रकरणी डॉक्टरविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जे ए मोरे करीत आहे.