आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात 7 व्या मजल्याच्या गॅलरीतून पडून 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घरी एकटीच होती मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-  इमारतीच्या सातव्या मजल्याच्या गच्चीतून पडून  एका तीनवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील कोथरूडमध्ये घडली. निकिता अभिजित पाटील असे मृत बालिकेचे नाव आहे. अभिजित पाटील आणि त्यांची पत्नी अायटी कंपनीत कामास असून ते दाेन मुलींसह कोथरूड येथे राहतात.
 
गुरुवारी त्यांची पत्नी नोकरीला गेली हाेती. अभिजित मोठ्या मुलीला शाळेच्या बसपर्यंत सोडण्यासाठी खाली गेले होते. त्या वेळी निकिता घरात झोपली होती.  जागी झाल्यानंतर घरात कोणीच न दिसल्याने ती गच्चीत आली. गच्चीतून खाली वाकून पाहताना खाली पडून तिचा मृत्यू झाला.

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...