आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापलिकेत 34 गावांच्या समावेशासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुनला उच्चस्तरीय बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश करण्याबाबत पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 21 जुनला मंत्रलयात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान गावांना मनपात समाविष्ट करण्याबाबत तीन आठवडयांत निर्णय घ्या असे आदेश दिले आहेत.
 
या बैठकीसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगर विकास विभागाचे संचालक आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीनंतर गावांचा महापालिका हद्दिमधे समावेश करण्याबाबत अंतिम प्रतिदन्यापत्र तयार करुन न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने महापालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तानी याविषयी 12 जूनला राज्य शासनाकड़े अहवाल सादर केला आहे. या अहवालावर अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे थोडा अवधी द्यावा, असे शासनाच्या वतिने न्यायालयात सांगितले होते. दरम्यान गावे समाविष्ट करण्याबाबत आमचा कल असल्याचे यापूर्वी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर 34 पैकी 19 गावांनी बहिष्कार घातला होता. 
 
पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीमधे विभागीय आयुक्तानी दिलेल्या अहवालावर विस्तृत चर्चा होऊन अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर हा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...