आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या सुधारगृहातून 38 महिला पळाल्या, 17 जणींचा शोध लागला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वानवडी येथील महिला सुधारगृहातील ३८ महिला सुधारगृहाची ताेडफाेड करून पळून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या सर्व मुली ‘पिटा’ कायद्याखाली अटक करण्यात अालेल्या असून त्यात काही बांगलादेशी युवतींचाही समावेश अाहे. दरम्यान, पाेलिसांनी यापैकी १७ जणींचा तातडीने ताब्यात घेऊन पुन्हा सुधारगृहात अाणले, तर इतर २१ जणी मात्र अजूनही फरारच अाहेत.

शरीरविक्री करणाऱ्या महिलांवर ठिकठिकाणी छापे टाकून अटक केलेल्या महिलांना पुण्याच्या वानवडी येथील शासकीय सुधारगृहात ठेवण्यात येते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास यापैकी ३८ महिलांनी सुधारगृहाची ताेडफाेड व जाळपाेळ करून तेथून पळ काढला. स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलांनी त्यांना धक्काबुक्की करत पळ काढला.

दरम्यान, सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पाेलिसांना पाचारण केले. पाेलिसांनीही तातडीने हडपसर परिसरात शाेधाशाेध केली असता त्यापैकी १७ जणींना पकडण्यात यश अाले, उर्वरित २१ जणी मात्र सापडू शकल्या नाहीत. त्यांचे यापूर्वीचे अड्डे, निवासस्थाने यांचा शाेध घेऊन पाेलिस तपास करत अाहेत. तसेच शहराची नाकेबंदीही करण्यात अालेली अाहे.