आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी घासायचा भांडी, अनेकांना चुना लावत कमावले 4 काेटी 16 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एकेकाळी पुण्यातील हाॅटेलमध्ये भांडी घासण्याची कामे करणारा अल्पशिक्षित तरुण, केंद्र सरकारचा व्हिजिलन्स अधिकारी असल्याची बतावणी करत लाल दिव्याच्या गाडीतून फिरत त्याने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला अाहे. या ठकबाजाकडून पाेलिसांनी ५० लाख रुपयांच्या महागड्या गाड्या जप्त केल्या अाहेत. डान्स बारमध्ये नर्तकींवर पैसे उधळण्यापासून घरात चैनीच्या वस्तू खरेदी करत त्याने मागील तीन वर्षांत चार काेटी १६ लाख रुपये जमवल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपअायुक्त पी.अार.पाटील व युनिट दाेनचे पाेलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

विशाल पांडुरंग अाेंबाळे (रा.येरवडा, पुणे) असे आरोपीचे नाव अाहे. त्याच्याविराेधात अातापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात अाले असून त्याच्या ताब्यातून ५० लाख रुपयांच्या अाॅडी, स्काेडा लाअाेरा, लान्सर कार, स्‍विफ्ट डिझायर या महागड्या गाड्यांसाेबत, स्वत:साठी बनवलेले अडीच लाख रुपये किमतीचे १० ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने, ३० हजार रुपये राेख, दाेन पिस्तुले, एक रिव्हाॅल्व्हर, ५० काडतुसे, राजमुद्रा असलेली व्हिजिटिंग कार्ड, लाल दिवा असा माल जप्त करण्यात अाला अाहे.
अाराेपीने बाळगले बाॅडीगार्ड
विशाल अाेंबाळे हा अालिशान गाड्या लाेकांकडून विकत घेण्याच्या बहाण्याने त्यांना थाेडे पैसे देऊन त्या वापरण्यासाठी घेत असे. त्यानंतर या गाड्यांवर लाल दिवा लावून अापण केंद्र सरकारचा व्हिजिलन्स अधिकारी असल्याचे लाेकांना सांगत असे. माझे मंत्रालयात चांगले संबंध अाहेत, तुम्हाला कमी व्याजदरात माेठ्या रकमेचे कर्ज तातडीने मंजूर करून देताे, अशी अामिषे दाखवत कराेडाे रुपयांची लाेकांची फसवणूक करत हाेता. अापण खराेखरच व्हिजिलन्स अधिकारी असल्याचे लाेकांना भासावे याकरिता पाच ते सात बाॅडीगार्ड, नामांकित हाॅटेलमध्ये वास्तव्य करायचा.
फसवणुकीच्या पैशांची उधळपट्टी
विशाल अाेंबाळे याने ठाणे येथे अाठ लाेकांना शासकीय कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने एक काेटी १७ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले अाहे. अाराेपीने अातापर्यंत डान्स बारमध्ये १५-२० लाख, महागड्या गाड्यांवर १६ लाख, महागड्या हाॅटेलवर ४० - ५० लाख, कॅन्सरग्रस्त अाईचा उपचार व वैद्यकीय खर्च ६० लाख, मुलांच्या शिक्षणावर अाठ लाख, घरखर्चावर १८ लाख, कार्यालय व फर्निचरसाठी २५-३० लाख, बाॅडीगार्डवर २८ लाख, साेने खरेदी सहा लाख, मित्रांना एक काेटी ४६ लाख उधार देत फसवणुकीच्या पैशांची उधळपट्टी केल्याची कबुली दिली अाहे.