आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बामू’ विद्यापीठाला सव्वाचार कोटींचे अनुदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या "दीनदयाळ उपाध्याय कुशल केंद्र’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांना प्रत्येकी सव्वाचार कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान २०१५- १६ आणि २०१६- १७ या दोन वर्षांसाठी आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये निर्माण करणे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कुशल, कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहेत.
या अनुदानाअंतर्गत विद्यापीठांमध्ये ऑटोमोटिव्ह, रिटेल मॅनेजमेंटसह काही नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी अग्रगण्य उद्योगसमूहांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहे, असे ‘यूजीसी’च्या वतीने कळविण्यात अाले अाहे.